मंगळवेढा टाइम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा शहरात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई शाखा सोलापूर व रत्नप्रभा सोशल फाऊंडेशन यांच्या वतीने दिवाळी निमित्त 'दिवाळी पहाट' या कार्यक्रमाचे शनिवार दि.26 ऑक्टोबर 2019 रोजी पहाटे 5.30 वा. लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय,किल्ला भाग येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती कार्यकारिणी सदस्य राहुल शहा यांनी दिली.
दिवाळी हा सणच मुळी उत्साह, आनंद आणि मनाला समृद्ध करणाऱ्या वातावरणाची अनुभूती देणारा. दिवाळीच्या निमित्ताने सांस्कृतिक पर्वणी अनुभवण्याची संधी असते. दिवाळीमुळे मिळणारा आनंद यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा आयोजित 'रत्नप्रभा सोशल फाऊंडेशन' द्विगुणित करणार आहे. लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय किल्ला भाग येथे २६ ऑक्टोबर रोजी पहाटे ५.३० वाजता 'दिवाळी पहाट' आयोजित करण्यात आली आहे.
सुवासिक उटण्यासह केलेल्या अभ्यंगस्नानानंतर नवीन कपडे घालून, फराळावर ताव मारल्यानंतर स्वरतालाची मैफल अनुभवणे ही सांस्कृतिक मौज या मैफलीतून अनुभवता येणार आहे. स्वरांचा हा दीपोत्सव नवा प्रकाश, नवी ऊर्जा देणार आहे. मराठी चित्रपट संगीताच्या वाटेने मराठी इतिहास मराठी संस्कृतीवर आधारित गीते रसिकांना ऐकता येतील.
पहाटेच्या प्रसन्नवेळी या सूर-तालांनी मंगळवेढेकरांची दिवाळी पहाट अजून प्रसन्न होईल.पहाटे साडेपाचला हा कार्यक्रम सुरू होईल.शनिवारी (ता.२६) प्रा.विलास पाटील यांच्या मराठी चित्रपट संगीताच्या वाटेने मराठी इतिहास मराठी संस्कृतीवर आधारित रसिकांची पहाट स्मरणीय होईल. सर्वांनी या कार्यक्रमास सहकुटुंब, मित्र परिवारासह उपस्थित राहण्याचे आवाहन राहुल शहा यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा