समाधान आवताडेंचा जनाधार वाढतोय;एकाकी लढत देऊनही ५४ हजारांचे मताधिक्य - Mangalwedha Times

Breaking

शनिवार, २६ ऑक्टोबर, २०१९

समाधान आवताडेंचा जनाधार वाढतोय;एकाकी लढत देऊनही ५४ हजारांचे मताधिक्य



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात एकाकी लढलेल्या समाधान आवताडे यांना ५४ हजारांपेक्षा अधिक मते मिळाली.पंढरपुरातून अपेक्षित मतदान न झाल्याने अपयश आले असले तरी ही मते त्यांना भविष्यातील राजकीय गणितासाठी सोयीची असल्याने या निवडणुकीतून त्यांचा जनाधार वाढल्याचे दिसून आले. 

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 7588214814

मागील निवडणुकीत शिवसेनेच्या चिन्हावर आवताडे यांनी लढत दिली होती.त्यात त्यांना ४० हजार ९१० मते मिळाली.त्यातील अपयशानंतर त्यांनी दामाजी कारखाना व पंचायत समिती व जिल्हा परिषदसह निम्म्याहून अधिक ग्रामपंचायतींवर वर्चस्व प्रस्थापित केले.अशा परिस्थितीत या निवडणुकीला सामोरे जात असताना भाजपकडून ते दावेदार होते.

जागा वाटपात ही जागा रयत क्रांतीकडे गेली. तेथून सुधाकरपंत परिचारक यांना संधी मिळाली म्हणून आवताडे यांनी जनतेच्या आग्रहाखातर अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. आवताडे स्वतः प्रचारक होऊन निवडणुकीला सामोरे गेले.अशा परिस्थितीत लोकांनी त्यांना दिलेली मते निश्चितच त्यांना भविष्यात राजकीय वाटचालीसाठी फायदेशीर ठरणार आहेत. 

त्यांना भोसे जिल्हा परिषद गटात अपेक्षित मतदान मिळाले नाही.तसेच हुलजंती गावात देखील मिळाले नाही.याशिवाय भोसे पंचायत समिती सदस्य सुरेश ढोणे यांनी ऐन निवडणुकीत परिचारक गटात प्रवेश केला. त्याचा परिणाम जाणवला.मतदारसंघातील वाढती बेरोजगारी व रखडलेले प्रश्न यावर फोकस ठेवून आवताडे यांनी प्रचार केला. 




त्यांना या प्रचारातून मारापूर, तामदर्डी, बोराळे, नंदूर, डोणज, लक्ष्मी दहिवडी, भालेवाडी, कचरेवाडी, घरनिकी, पाटखळ, ममदाबाद (शे.) , देगाव, ढवळस, मंगळवेढा शहर, मल्लेवाडी, धर्मगाव, गणेशवाडी, बालाजीनगर, कर्जाळ , कात्राळ, कागष्ट, खवे, अकोला, माचणूर, रहाटेवाडी, हिवरगाव, जालीहाळ, मरवडे, जित्ती, बावची आदी गावांत आवताडे यांना मताधिक्य मिळाले आहे. 

काही गावांत ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत.आता त्यांना लोकांशी सातत्याने संपर्क ठेवून राहावे लागणार आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा