मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी मतदार नोंदणी करण्यासाठी २३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर २०१९ या कालावधीत मतदार यादीत नव्याने नाव नोंदविण्याची संधी मिळणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी अधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
निवडणूक आयोगाने 1 नोव्हेंबर 2019 या अर्हता दिनांकावर आधारित पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी नव्याने मतदार नोंदणी करण्याचा कार्यक्रम घोषित केला आहे. या कार्यक्रमांतर्गत 6 नोव्हेंबर 2019 पर्यंत दावे व हरकत स्वीकारण्याचा अंतिम दिनांक आहे. या कार्यक्रमांतर्गत 23 नोव्हेंबर 2019 ते 9 डिसेंबर 2019 या कालावधीत पुन्हा दावे व हरकती स्वीकारण्यात येणार असून 30 डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणार आहे.
त्यानंतर निरंतर मतदार नोंदणी चालू राहणार आहे. त्याअंतर्गत नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत विहीत कार्यपध्दतीनुसार निकाली काढणेस पात्र असलेले सर्व दावे निकाली काढण्यात येतील.
त्यानंतर पात्र मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात येणार आहेत. त्यामुळे पदवीधर व शिक्षक मतदार संघाकरिता मतदार नोंदणीकरिता मुदतवाढ देण्याची आवश्यकता नसल्याचे पत्र मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा