मंगळवेढयातून अवैधरित्या जनावरे वाहतूक करणारा जनावरांचा टेंपोवर कारवाई न करता शनिवारी मध्यरात्री सोडून देण्याचा प्रकार मंगळवेढा पोलिसांकडून घडला असून जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
शनिवारी मध्यरात्री कर्नाटक राज्याकडे जाणाऱ्या एका टेंपोत दाटीवाटीने खिलार गाई भरून दाव्याने करकचून बांधून जात असल्याची माहिती तहसीलदार यांना समजली.तहसीलदार यांनी याबाबत पोलिसांना चौकशी करण्याचे कळविले.
या वाहनामध्ये दाटीवाटीने जवळपास चार खिलार गायी व एक खोंड असे दाव्याने करकचून बांधण्यात आले होते तहसीलदारांनी कळविताच पोलिस मरवडे मार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ जावून त्यांनी सदर जनावरे घेवून जाणाऱ्या जनावरांची चौकशी केली.व त्यांनी ही जनावरे कर्नाटकातील मौजे टाकळी ,ता.इंडी येथे ऊस तोडणीसाठी कामगार घेवून जात असल्याची नोंद स्टेशन डायरीला घेतली आहे. टेंपोतील या जनावरांची हालअपेष्टा झाल्याची तक्रार गोरक्षकांची आहे.
कर्नाटकातील कत्तलखान्याकडे मंगळवेढयातून खिलार गाईंचे वाहन जात असल्याचे गोरक्षकांनी भ्रमणध्वनीवरून सांगितले.हा प्रकार अतिशय चीड आणणारा असून एकीकडे शासन गोहत्या बंदी आणून मुक्या जनावरांचे जीव वाचविण्याचा प्रयत्न करीत असताना येथे पोलिसांच्या नातेवाईकांची जनावरे असल्यामुळे सदर वाहन कुठलीही कारवाई न करता सोडून देणे म्हणजे गोहत्येला पाठबळ दिल्यासारखेच आहे.वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी यात तातडीने लक्ष घालून सखोल चौकशी करावी व दोषींविरूध्द कडक कारवाई करावी.- शशिकांत चव्हाण,जिल्हा उपाध्यक्ष,भारतीय जनता पार्टी .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा