मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
गेली 8 ते 10 वर्षे ऊस हंगामाची सुरवात आणि ऊस आंदोलन जणु एक समिकरणच बणले आहे. प्रत्येक वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस दरासाठी टोकाची भूमिका घेतली आहे यामध्ये हजारो शेतकऱ्यांच्या पोरांना जेल मध्ये जावं लागल तरी ही कधीच स्वाभिमानी ने हार मानली नाही या ही वर्षी ऊसाच्या दराचे आंदोलन अटळ असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सचिन पाटील यांनी दिली आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
येत्या 23 नोव्हेंबर ला जयसिंगपूर ला स्वाभिमानी ची ऐतिहासिक ऊस परिषद होणार आहे त्या ठिकाणी चालु गळीत हंगामात ऊसाची पहिली उच्चल किती असणार याची घोषणा शेतकरी नेते राजु शेट्टी करणार आहेत.
प्रत्येक वर्षी पेक्षा या वेळची परिस्थिती वेगळी आहे, ऊस उत्पादक शेतकरी हा अस्मानी व सुलतानी संकटांनी घायाळ झालेला आहे, उन्हाळा पडलेला दुष्काळ आणि पावसाळ्याच्या अखेरीस झालेल्या अतिवृष्टीमुळे अलेल्या महापुरामुळे ऊसाचे क्षेत्र कमालीचे घटले आहे अशा परिस्थितीत राज्य सरकारने गेल्या पाच वर्षांत शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची भरीव मदत केलेली नाही त्यामुळे आजच्या घडीला शेतकरी मेटाकुटीला आलेले आहे.
त्यामुळे सर्व चेअरमन मंडळीनी थोडा वेळ तरी राजकीय जोडे बाजुला ठेवुन शेतकर्यांना कशा प्रकारे जास्तीत जास्त ऊसाला दर देता येईल याचा विचार करणे गरजेचे आहे येणाऱ्या सरकारकडुन शेतकरी सरसकट कर्जमाफी साठी आस लावून बसलेले असताना या वर्षी कारखान्याला जाणारा थोडका ऊस शेतकऱ्यांच्या प्रपंच्या च्या गाड्याचा आधार आहे.
त्यामुळे सर्व कारखानदारांनी प्रत्येक वर्षी प्रमाणे वेळकाढूपणानाची भुमिका घेऊन ऊसाचा दर जाहीर न करता कारखाने सुरू करण्याचा प्रयत्न करुण आंदोलन हाणुन पाडण्याचा प्रयत्न झाला तर गेल्या पाच वर्षापासून संतापलेल्या शेतकर्यांच्या संतापाचा कडेलोट झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे दबलेल्या पिचलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी कारखानदारानी पुढाकार घेतला तर आपण आंदोलने व होणारे नुकसान टाळु शकतो.
ऊसाचा दर जाहीर न करता कोणीही धुराडी पेटवण्याचा प्रयत्न केला तर ऊस आंदोलन अटळ आहे, कोणत्याही परिस्थितीत स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांना समाधान कारक ऊसाचा पहिला हप्ता मिळेपर्यंत शांत बसणार नाही. 23 नोव्हेंबर ला जयसिंगपूर ला ऊस परिषद होणार आहे तरी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा