मरवडे येथे महावितरणचा भोंगळ कारभार, उघड्या डीपीचा स्फोट - Mangalwedha Times

Breaking

रविवार, १७ नोव्हेंबर, २०१९

मरवडे येथे महावितरणचा भोंगळ कारभार, उघड्या डीपीचा स्फोट




मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथे महावितरणच्या डीपीचा अचानक स्फोट झाला आणि आग लागली.सुदैवाने जवळ कोणी नसल्यामुळे दुर्घटना टळली.आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814

मरवडे गावा जवळील स्मशानभूमी डिपीवरुन इंद्रानगर,साठेनगर,बाजार चौक,शिवाजी चौक भागाला वीजपुरवठा केला जातो.

महावितरणकडून डिपीची देखभाल दुरुस्ती केली वेळेवर केली जात नसल्यामुळे डिपीला रविवारी सकाळी अचानक मोठा आवाज होऊन डिपीला आग लागली. 

आग लागल्याचे दिसताच येथील रहिवाशी आनंदा जाधव यांनी तात्काळ याची महावितरणला माहिती दिली. महावितरणचे समाधान चौगुले, अमोगसिद्ध ढगे व सूरज घुले यांनी तात्काळ वीजपुरवठा खंडित केला.महावितरण कर्मचाऱ्यांच्या मदतीने आग विझविली. घटनेचे गांभिर्य ओळखून नागरिकांनी वेळीच आग विझविल्याने विद्युत डिपीचे होणारे मोठे नुकसान टळले आहे.





 मरवडे गावातील स्मशानभूमी डीपी ओव्हरलोड मुळे केबल जाळली ऑईल बाहेर आल्यामुळे  डीपी ने पेट घेतला, असा अंदाज महावितरणचे कर्मचारी सुरज घुले यांनी व्यक्त केला आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा