मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
आमच्या परस्पर लोकप्रतिनिधीकडे रस्त्याची तक्रार का केली तसेच रस्त्यावर काठाडया लावल्याच्या कारणावरून माचणूर येथील दोन गटात हाणामारीचा प्रकार घडला असून या प्रकरणी आठ जणांविरूध्द गुन्हा दाखल झाला असून ही घटना माचणूर येथे मारूतीच्या मंदिरासमोर घडली आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :7588214814
या घटनेची हकिकत अशी , दि . १६ रोजी सकाळी ११ . ०० च्या दरम्यान माचणूर येथे लोकप्रतिनिधींनी विधानसभा निवडणूकीचा आभार दौरा आयोजित केला होता .यावेळी यातील फिर्यादी सागर कलुबर्मे यांनी वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याची तक्रार लोकप्रतिनिधीसमोर मांडली होती .
तुम्ही आमचे परस्पर लोकप्रतिनिधीकडे तक्रार का केली याची विचारणा करीत फिर्यादी सागर कलुबर्मे त्याची आई कमल कलुबर्मे , काकू मंगल बापू पवार यांना लाथाबुक्क्याने मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले असून या प्रकरणी रमेश धर्मराज डोके , महादेव बजरंग फराटे , भारत शिवाजी डोके , रोहित गोरख डोके यांचे विरूध्द भा . द . वि . ३२३ , ५०४ , ५०६ , ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर दसऱ्या घटनेत महादेव फराटे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की , माचणूर ते तामदर्डी जुन्या रस्त्यावर काठयाडया लावल्या होत्या . फिर्यादीने काठयाड्या का लावल्या याबाबत आमदार यांचेकडे तक्रारी अर्ज देणार आहे असे म्हणाल्यावर फिर्यादीस आरोपी बजरंग कृष्णा कलुबर्मे , उत्तम कृष्णा कलुबर्मे , सागर प्रकाश कलुबर्मे , दिपक साहेबराव कलुबर्मे आदींनी शिवीगाळ , दमदाटी करून हाताने मारहाण केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले असून वरील चौघांविरूध्द भा.द.वि. ३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा