मंगळवेढ्यातील जळीत हत्याकांड प्रकरणात आणखी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू - Mangalwedha Times

Breaking

सोमवार, १८ नोव्हेंबर, २०१९

मंगळवेढ्यातील जळीत हत्याकांड प्रकरणात आणखी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा तालुक्यातील महमदाबाद येथे घरगुती कारणावरून लक्ष्मण घुंबरे याने भावाच्या कुटुंबास पेट्रोल टाकून जाळून मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये पुतण्या शरद घुमरे याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तसेच दहा-बारा दिवस रुग्णालयात उपचार सुरु असलेला भाऊ सोपान घुमरे यांचा उपचारा दरम्यान रात्री शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814


भाऊ लक्ष्मण घुमरे यांने केलेल्या या कृत्यातून सोपान घुमरे यांचा बी.एससी शिक्षणासाठी बाहेरगावी असलेला मुलगा संतोष व दहावीत शिकणारी मुलगी सुरेखा आई-वडिलांपासून लांब अंतरावर झोपल्याने सुदैवाने यातून बचावल्या होत्या. सदरची घटना 6 नोव्हेंबर रोजी पहाटे चारच्या सुमारास घडली होती. आरोपी लक्ष्मण घुमरे यास पोलीसांनी तात्काळ ताब्यात घेतले. 

पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडल्यानंतर शेजारी व नातेवाईक यांनी तातडीने जखमी सोपान, सोनाबाई व शरद या तिघांना खासगी वाहनाने सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. 

उपचार सुरू असताना 50 टक्के पेक्षा जास्त भाजलेने शरदचा मृत्यू झाला. सोनाबाई  व सोपान हे पती-पत्नी भाजले असून त्यांच्यावरही  सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. घरात लक्ष्मण व त्याचे इतर तीन भाऊ गेल्या वर्षांपासून वेगळे राहत होते. आरोपी लक्ष्मण हा यापूर्वी एकत्र कुटूंबातील कारभारी होता. व ऊसतोड मूकादम म्हणून ऊस तोडणीसाठी टोळ्या भरत असे. 

आपल्या सर्व भावांनाही आपल्याच टोळीत ऊसतोड करण्यास नेत होता. आरोपीस दारूचे व्यसन असलेने सोपान व इतर भाऊ गेल्या वर्षीपासून वेगळे राहिले होते. सख्खा भाऊच दुसऱ्या भावाच्या संपूर्ण कुटुंबांच्या जिवावर उठल्याने हा परिसर या घटनेने हादरून गेला.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा