मंगळवेढा तालुक्यातील शिरनांदगी येथील तलावामध्ये पाण्यात पडून बुडून एका ८५ वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी ८ . ०० वा . घडली असून पांडुरंग महादेव शिंदे असे बडन मयत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे . आकस्मित मयत अशी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
यातील मयत हे दि . १६ रोजी सकाळी ८ . ०० वा . शिरनांदगी येथे असलेल्या तलावाकडे गेले होते . यावेळी ते पाण्यात पडून बुडून मयत झाले असल्याची खबर मुलगा मारुती शिंदे यांनी दिली आहे.
पोलिसांनी आकस्मित मयत अशी नोंद घेवून अधिक चौकशीसाठी प्रेत राखून ठेवले आहे. या मयताचा तपास पोलिस हवालदा शहानूर फकिर हे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा