मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मला तू खूप आवडतेस असे म्हणून एका २६ वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी बाळासाहेब भगवान बनसोडे (रा.सलगर. ता.मंगळवेढा) याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
या घटनेची हकिकत अशी,यातील फिर्यादी ही मुलासोबत घरी असताना सावत्र दिर तथा आरोपी बाळासाहेब बनसोडे हे दि.१६ रोजी दुपारी ३ वा. फिर्यादीच्या घरी गेला होता.
फिर्यादीच्या जवळ जावून तुझा नवरा कुठे गेला आहे अशी विचारणा केली. यावेळी फिर्यादीने ते कामावर गेले आहेत. असे सांगितले यावेळी आरोपीने फिर्यादीस तु मला खूप आवडतेस असे म्हणून जवळीकता साधण्याचा प्रयत्न करून स्वतःजवळ ओढून घेवून लज्जा वाटेल असे कृत्य केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
या घटनेनंतर फिर्यादीने आरोपीस ढकलून देवून घराच्या बाहेर ओरडत पळ काढला. फिर्यादीच्या पाठोपाठ घराबाहेर येवून फिर्यादीस अश्लील शिवीगाळी करून लाथाबुक्क्याने मारहाण केली. यावेळी आरोपीने फिर्यादीच्या डाव्या हाताच्या दंडाचा चावा घेतला. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक फौजदार एम.बी.जमादार हे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा