मंगळवेढ्यात जन्मदात्या वडीलास व बहिणीस मारहाण केल्याप्रकरणी दोन मुलास तीन महिन्याची शिक्षा - Mangalwedha Times

Breaking

बुधवार, १३ नोव्हेंबर, २०१९

मंगळवेढ्यात जन्मदात्या वडीलास व बहिणीस मारहाण केल्याप्रकरणी दोन मुलास तीन महिन्याची शिक्षा



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

तुम्ही आमचे हाल केले तुम्ही येथून निघून जा असे म्हणून वडीलास लोखंडी गजाने व सावत्र बहिणीस पाईपने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी प्रविण जाधव व प्रशांत जाधव (दोघे रा.लवंगी ता .मंगळवेढा ) या दोन मुलास मंगळवेढा न्यायालयाचे न्यायाधीश जी . एम . चरणकर यांनी तीन महिने शिक्षा व ३ हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे . 
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
या घटनेची हकीकत अशी की , यातील फिर्यादी ज्योतीराम शामराव जाधव ( वय ६५ रा . लवंगी ) यांचे दोन विवाह झाले होते . पहिला विवाह कुसुम हिज बरोबर झाला होता . तिच्यापासून प्रविण व प्रशांत अशी दोन अपत्ये झाली होती . कालांतराने प्रविण यास फिर्यादीकडे सोडून प्रशांत यास घेवून पत्नी कुसुम माहेरी शेगाव , ता . जत येथे निघून गेली होती . तद्नंतर आई वडीलांनी फिर्यादीचे दुसरे लग्न वंदना हिजबरोबर करून दिले . तिच्यापासून एक मुलगा व एक मुलगी अशी अपत्ये झाली. 



दि . १ ऑगस्ट २०१६ रोजी दुपारी दोन वाजता मुलगा प्रशांत हा घरी आला व फिर्यादीस म्हणाला मी व माझी आई २५ वर्षे बाहेर राहत आहोत तुम्ही आमचे कसे हाल केले . तुम्हीही या ठिकाणी रहायचे नाही तुम्ही निघून जावा अशी धमकी दिली व गज घेवून मारण्यासाठी अंगावर धावून आला . शेजारी राहणारे जयवंत निकम व राजू जाधव यांनी ही भांडणे मिटवली होती . दि . ५ ऑगस्ट दुपारी १ . ३० च्या दरम्यान फिर्यादी झोपले असताना आरोपी प्रशांत व अन्य तिघांनी येऊन फिर्यादीची मुलगी प्रेरणा हिस पाईपने मारून तिला घरात कोंडन ठेवले व फिर्यादीस शिवीगाळ करून तुम्ही येथून गेला नाहीत का ? अशी विचारणा करून हातातील गजाने फिर्यादीस दोन्ही पायाच्या नडगीवर हातावर पाठीवर मारून गंभीर जखमी केले होते . या घटनेचा तपास पोलीस हवालदार सुधीर माने यांनी करून मंगळवेढा न्यायालयात आरोपी विरूद्ध आरोप पत्र दाखल केले . 

या घटनेत सुनवाणी दरम्यान फिर्यादीची साक्ष , आरोपीच्या बहिणीची साक्ष , पंचाची साक्ष महत्वाच्या ठरल्या . यावेळी सरकारी वकील अॅड .धनंजय बनसोडे यांनी आई वडीलांना सांभाळण्याची जबाबदारी मुलांची असताना मुलानेच जन्मदात्या वडीलास मारहाण केली असून यामध्ये लहान मुलगी गंभीर जखमी झाली आहे . त्यामुळे अशा स्थितीत दया दाखविणे योग्य होणार नाही असा महा न्यायालयासमोर मांडल्यानंतर न्यायालयाने आरोपीस ३ महिन्याची शिक्षा व प्रत्येकी ३ हजार दंड व दंड न भरल्यास सात दिवस शिक्षा अशी शिक्षा सुनावली . कोर्टपैरवी म्हणून सहाय्यक फौजदार हरिदास यांनी काम पाहिले . 

दरम्यान , भारत देश २१ व्या शतकाकडे वाटचाल करीत असतान समाजामध्ये अनेक ठिकाणी जन्मदात्या आईवडीलांना मारहाण करून काही ठिकाणी घराच्या बाहेर काढल्याच्या घटना आहेत . त्यांना नाईलाजाने उर्वरित जीवन जगण्यासाठी वृद्धाश्रमाचा आधार घ्यावा लागत असल्याचा ज्वलंत उदाहरण आहेत . या शिक्षेमुळे आईवडीलांना मारहाण करणा - या व न सांभाळणाऱ्या मुलांना या निकालाने चपराक बसली आहे .




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा