वर्गणीचा हिशोब मागितल्याने मारहाण 'दामाजी'च्या संचालकासह दोघाविरूध्द गुन्हा दाखल  - Mangalwedha Times

Breaking

मंगळवार, १२ नोव्हेंबर, २०१९

वर्गणीचा हिशोब मागितल्याने मारहाण 'दामाजी'च्या संचालकासह दोघाविरूध्द गुन्हा दाखल 



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

नवरात्र उत्सवा करिता गोळा केलेल्या वर्गणीचा हिशोब विचारल्याच्या कारणावरून कागष्ट येथील शांताराम आप्पांना बिराजदार (वय ५०) यांना लाथाबुक्यानी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दामाजी कारखान्याचा संचालक बापूसाहेब मधुकर काकेकर (वय ३५), माजी सरपंच बाळासाहेब दिगंबर जगताप (वय ४५),संजय विठ्ठल काकेकर (वय ४६) सर्व राहणार कागस्ट यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना सकाळी ९:३० वाजता कागस्ट येथील अंबाबाई मंदिरासमोर घडली आहे.      

 बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: 7588214814

याबाबत अधिक माहिती अशी की,कागस्ट गावातील नवरात्र उत्सवा करिता ऑक्टोबर महिन्यात देणगी गोळा करण्यात आली होती, या नवरात्र मंडळाचे अध्यक्ष म्हणून माजी सरपंच बाळासाहेब जगताप यांना नवरात्र उत्सवाकरिता गोळा केलेल्या वर्गणीचा हिशोब फिर्यादी शांताराम आप्पांना बिराजदार विचारत असताना आरोपी यांनी तू आम्हाला हिशोब विचारणारा कोण?असे म्हणून फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली.



तसेच त्यांचे भांडण सोडविण्यासाठी मध्ये पडलेल्या फिर्यादीच्या पत्नी सौ इंदुबाई यांनाही धक्काबुक्की केली तसेच पुन्हा हिशोब विचारलेस जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद शांताराम बिराजदार यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात दाखल केली असून अधिक तपास पोलिस नाईक सलगर करीत आहेत.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा