बालनाटय केंद्राच्या माध्यमातून चांगले कलावंत घडतील ः युसूफ बारगीर - Mangalwedha Times

Breaking

सोमवार, ११ नोव्हेंबर, २०१९

बालनाटय केंद्राच्या माध्यमातून चांगले कलावंत घडतील ः युसूफ बारगीर


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा येथे सुरू होणार्‍या बालनाटय केंद्राच्या माध्यमातून अनेक चांगले कलावंत घडतील अशी अपेक्षा कोल्हापूरचे नाटय दिग्दर्शक युसुफ बारगीर  यांनी केले.

मंगळवेढा येथे बालदिनाचे औचित्य साधून 14 नोव्हेंबर रोजी बालनाटय केंद्र सुरू होणार असून या बालनाटय केेंद्राच्यावतीने होणार्‍या पहिल्या बिलंदर चेटकी या बालनाटयाच्या पटकथेचे पुजन शहर एन्टरटेन्मेंटचे दिगंबर भगरे यांचे हस्ते करण्यात आले. त्यावेळी माहिती देताना बारगीर बोलत होते.

यावेळी युसुफ बारगीर म्हणाले, लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्याकरीता बालनाटयाची सुरूवात मंगळवेढा शहरामध्ये सुरू करीत आहोत. आजचे बालक कार्टून व मोबाईल यामध्ये व्यस्त झाले असून त्याचा अतिवापराने पालक त्रस्त होत आहेत. यातून परावृत्त करण्यासाठी व त्यांच्या कलागुणांच्या विकासासाठी या बालनाटयाची योजना राबवत असून पालकांनी उत्स्फुर्तपणे आपल्या पाल्यास या बालनाटय केंद्राच्या माध्यमातून लाभ मिळवून देवून त्यांच्या सुप्त कला गुणांना वाव द्यावा असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी मधुकर भंडगे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्तविक, सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन केेंद्रप्रमुख मनिषा देशपांडे यांनी केले.
व्यासपीठावर प्रा.कल्पेश कांबळे, लहु ढगे, सतिश महामुनी, बापु पवार, कल्याण घुले,  राहुल इकारे आदि उपस्थित होते.
दरम्यान, 14 नोव्हेंबरपासून सुरू होत असलेल्या बिलंदर चेटकी या दोन अंकी बालनाटयात सहभागी होवू इच्छिणार्‍यांनी 9834069761, 8483830861 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन मनिषा देशपांडे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा