मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
गेल्या ऑगस्टमध्ये बंद झालेल्या छावणी चालकांचे जवळपास 4 महिन्यांचे अनुदान देणे बाकी होते. त्यापोटी 14 कोटी 92 लाख 70 हजार 249 रुपयांचा निधी शासनाकडून प्राप्त झाला असून तो छावणी चालकांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी उत्तम पाटील यांनी दिली असून मंगळवेढा तालुक्यासाठी २ कोटी ५३ लाख ४२ हजार ५३३ रुपये एवढी रक्कम मिळणार आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: 7588214814
गतवर्षी आणि यंदाही सुरुवातीला पाऊस कमी पडल्याने दुष्काळाच्या छायेत असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील पशुधन जगविण्याचा मोठा प्रश्न पशुपालक आणि शेतकर्यांसमोर उभा होता. त्यामुळे शासनाने जिल्ह्यात जवळपास 282 चारा छावण्या सुरु केल्या होत्या. यामध्ये जवळपास 2 लाखांपेक्षा अधिक जनावरांना जवळपास पाच महिने जगविण्यात आले होते.
त्यासाठी सुमारे 32 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. मात्र ऑगस्ट महिन्यात सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात समाधानकारक पाऊस पडल्याने शासनाने या चारा छावण्या बंद करण्याचा निर्णय घेतला होता.
सगळीकडेच समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकर्यांकडे चारा आणि विहिरीत पाणी उपलब्ध झाले होते. त्यामुळे ऑगस्टमध्ये शासनाने चारा छावण्या बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र चारा छावणी चालकांचे अनुदान शासनाकडे प्रलंबित होते. ते अनुदान तत्काळ मिळावे, यासाठी माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन छावणी चालकांची देणी तत्काळ द्यावीत, अशी मागणी केली होती.
मात्र राज्यात शासन नसल्याने हे पैसे मिळण्यासाठी विलंब होत होता. यासाठी जिल्हाधिकारी भोसले यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने हा निधी उपलब्ध झाला असून त्या-त्या तालुक्याच्या तहसीलदारांना हा निधी वर्ग करण्यात आला आहे. तसेच हे पैसे सर्व गोष्टींची खात्री करुन त्या-त्या छावणी चालकांच्या खात्यावर तत्काळ जमा करावेत, अशा सूचना जिल्हाधिकार्यांनी दिल्या आहेत.
तालुका वितरीत अनुदान
बार्शी 1333992,अक्कलकोट 65909,करमाळा 7033670,माढा 23109465,पंढरपूर 5569664,मोहोळ 1633659,मंगळवेढा 25342533,सांगोला 78615398,माळशिरस 6565959 असे एकूण 149270249

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा