मंगळवेढ्यात चोरट्यांनी मोटर सायकलसह ६० हजारांचा मुद्देमाल चोरून नेला - Mangalwedha Times

Breaking

शुक्रवार, २९ नोव्हेंबर, २०१९

मंगळवेढ्यात चोरट्यांनी मोटर सायकलसह ६० हजारांचा मुद्देमाल चोरून नेला



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

मंगळवेढा तालुक्यातील बोराळे येथे चोरटयाने बंद घराचे कुलूप तोडून व कडी वाकवून घरात प्रवेश करून घरातील रोख रक्कम , सोन्याचे दागिने व मोटर सायकल असा एकूण ६० , ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरटयाने चोरून नेल्याची घटना दि . २८ च्या पहाटे घडली असून या प्रकरणी अज्ञात चोरटयांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे . 
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814

या घटनेची हकिकत अशी , यातील फिर्यादी नंदा सुभाष थडगे ( वय ६५ ) या वृध्द महिलेचे बंद घराचे कूलूप तोडून व दरवाजाची कडी वाकवून चोरटयाने घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम तसेच पिराप्पा बनसोडे यांनी त्यांची एम एच १३ सी झेड ९६११ युनिकॉर्न मोटर सायकल घरासमोर लावली होती . 

या मोटर सायकलसह चोरटयांनी ६० , ५०० रुपयांचा मुद्देमाल दि . २८ च्या पहाटे चोरून नेला असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे . अधिक तपास बोराळे बीटचे पोलिस हवालदार गायकवाड हे करीत आहेत .




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा