मंगळवेढ्यात बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडले ; मशीन चोरून नेण्याचा प्रयत्न फसला - Mangalwedha Times

Breaking

शनिवार, ३० नोव्हेंबर, २०१९

मंगळवेढ्यात बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडले ; मशीन चोरून नेण्याचा प्रयत्न फसला

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

मंगळवेढा शहरातील शनिवारी पेठ येथे असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीन अज्ञात चोरट्यांनी फोडले असून मशीनच घेऊन जाण्याचा प्रयत्न फसला आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
चोरट्यांनी शुक्रवारी रात्री एटीएम केंद्रात प्रवेश करून मशीन टिकावाने फोडून उचकटण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यातील रक्कम किती होती किती चोरीला गेली याची माहिती मिळू शकली नाही. चोरट्यांनी एटीएम केंद्राचे शटर लावून पोबारा केला. शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

सकाळी 8 वाजेपर्यंत ना पोलीस प्रशासन आले ना बँकेचे अधिकारी आले नव्हते त्यामुळे तेथील नागरिकांनी एटीएम फोडलेले पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती.









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा