मंगळवेढा शहरानजीक असलेल्या घाटूळ वस्ती येथील एका अल्पवयीन मुलीवर दोन अज्ञातांनी तीचे इच्छेविरूध्द बळजबरीने शारिरिक संबंध ठेवून अत्याचार केल्याने ती गदोदर राहिल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: 7588214814
याबाबत अधिक माहिती अशी की ,१६ वर्षे ७ महिन्याची असलेली ती मुलगी मे महिन्यात किराणा माल घेवून घाटूळ वस्ती येथील घराकडे येत असताना एकअनोळखी मुलाने तीला बळजबरीने तीला ऊसात ओढत नेवून तीच्या मनाविरूध्द शरीरसंबंध केले .त्यानंतर दहा ते बारा दिवसांनी दुसऱ्या एका अनोळखी मुलाने तीला शेतातील ऊसात बळजबरीने नेवून अतिप्रसंग करून शरीरसंबंध केले व कोणाला सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
त्या दोन अनोखळी मुलांनी शरीरसंबंध केल्याने पिडीत मुलगी गरोदर राहिली आहे. सध्या ती करकंब येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहे.
याची फिर्याद त्या मुलीने करकंब पोलिस स्टेशनला दाखल केली. ती शुन्य क्रमांकाने मंगळवेढा पोलिस स्टेशनला वर्ग करण्यात आली आहे.
पोलिसांनी सदर दोन अनोळखी इसमाविरूध्द भादंवि .स ३७६ ( १ ) , ५०४ , ३४ , बाललैंगिक अत्याचार संहिता २०१२ चे कलम ४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक सचिन खटके हे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा