मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथील भीमा नदीपात्रात बुडणाऱ्या सहा जणांना माजी सरपंच सुनील पाटील यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता वाचवले.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: 7588214814
रविवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास ही घटना घडली . त्यामुळे देव तारी , त्याला कोण मारी ! या म्हणीचा प्रत्यय आला . बुडणारे हे मुंबईचे पर्यटक होते . माचणूर येथे भीमा नदी तुडुंब भरून वाहत आहे . येथे पर्यटक श्री सिद्धेश्वराच्या दर्शनासह परिसर पाहण्यासाठी येतात रविवारी दुपारी आठ तरुण बंधाऱ्याजवळ नदीपात्रात उतरले.
पाण्याचा अंदाज आल्याने प्रवाहात पुढे सरकताना सहाजण नदीपात्रात मध्यभागी गेले . ते बुडत असल्याचे बंधाऱ्यावरून निघालेले माजी सरपंच सुनील पाटील यांनी पाहिले . तत्काळ त्यांनी पाण्यात उडी घेतली .एकामागून एक अशा पाचही जणांना पाण्यातून बाहेर काढले .
दरम्यान,नदीपात्रात मध्यभागी असलेल्या पाच जणांना बाहेर काढताना पाटील यांचीही दमछाक झाली . ताण आल्याने त्यांची प्रकृती बिघडली . त्यामुळे ते दिवसभर घरी झोपून होते .आतापर्यंत त्यांनी अनेकांना वाचवले असुन त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे प्रचंकोशीमध्ये त्यांचे कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा