मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा तालुक्यातील सांगोला रोडवरील असलेल्या गणेशवाडी बोदगा स्टॉप येथील तानाजी वाकडे यांच्या लिंबूच्या बागेतील शेतात पुरुष जातीचा मृतदेह आढळला आहे.या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. मृत इसमाचे नाव अद्याप स्पष्ट झाले नाही पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 7588214814
याबाबत सविस्तर माहिती अशी की,पाऊस पडत असल्याने गेल्या १५ दिवसापासून तानाजी वाकडे हे शेतात गेले नव्हते.
आज सोमवारी सकाळी १० च्या सुमारास लिंबुची बाग फावरत असताना कामगार सतीश आवताडे यांना हा कुजलेले मृतदेह आढळला असून परिसरात खळबळ उडाली आहे.
मृतदेहाची अद्याप ओळख पटली नसून हा मृतदेह कोणाचा आहे इथे कसा आला याचा तपास पोलीस करणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा