मंगळवेढ्यात सोने खरेदीच्या बहाण्याने ३५ हजारांचे सोने लुटले ४ आरोपी सीसीटीव्हीत कैद - Mangalwedha Times

Breaking

शुक्रवार, ८ नोव्हेंबर, २०१९

मंगळवेढ्यात सोने खरेदीच्या बहाण्याने ३५ हजारांचे सोने लुटले ४ आरोपी सीसीटीव्हीत कैद


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
सोने खरेदीचा बहाणा करून दुकान सोने दुकानात आलेल्या अनोळखी दोन महिला व दोन पुरूषांनी मिळून पस्तीस हजार शंभर रुपयांचा ऐवज चोरून नेला ही घटना आज मंगळवेढा येथे घडली.दुकानमालक अमोल रत्नपारखी यांनी फिर्याद दिली.अज्ञात चार चोरट्यांविरोधात मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 7588214814       
याबाबत अमोल रत्नपारखी वय 42 यांनी फिर्याद दिली असून त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की गुरुवारी सकाळी १० वाजता शहरातील बाजारपेठेत अमोल ज्वेलर्समध्ये कामगार साफसफाई करीत होते . दोन अनोळखी महिला व दोन दुकानातील अनोळखी पुरुष हे दुकानात आले.

त्यांना सोन्याचे डोरलेमणी सेट दाखविण्यास कामगार रोहिणी शिंदे हिला फिर्यादी रत्नपारखी यांनी सांगितले . त्यांना डोरलेमणी सेटचा ट्रे समोर ठेवून दाखवला . साफसफाई चालू असल्यामुळे चेनचा ट्रेन समोरील काउंटर ठेवला होता.दागिने पसंत नाहीत म्हणत चौघे दुकानातून निघून गेले काही वेळाने रोहिणी शिंदे हिने फिर्यादी रत्नपारखी यांना डोरले मणी सेट ट्रे मधील एक सेट कमी आहे .तुम्ही काल विकला आहे का ? अशी विचारणा केली. 

फिर्यादीस शंका आल्याने सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले असता त्यांना वरील चार अनोळखी व्यक्तींनी नजर चुकून दुकानातील एक चेन व एक डोरले मणी सेट चोरल्याची खात्री झाली . ऐवज चोरून नेला सदरची घटना दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा