अयोध्या प्रकरण सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मंगळवेढ्यातील मुस्लिम समाजाला मान्य : बाबूभाई मकानदार - Mangalwedha Times

Breaking

शनिवार, ९ नोव्हेंबर, २०१९

अयोध्या प्रकरण सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मंगळवेढ्यातील मुस्लिम समाजाला मान्य : बाबूभाई मकानदार

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणी आज सुप्रीम कोर्टाने आपला ऐतिहासिक निकाल दिला आहे.हा निकाल मंगळवेढा तालुक्यातील मुस्लिम समाजाला मान्य असून आम्ही या निर्णयाचे स्वागत करती असल्याचे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष बाबूभाई मकानदार यांनी केले आहे.



अयोध्येतील वादग्रस्त जागा रामलल्लाचीच असून काही अटी शर्तीच्या आधारावर ती हिंदुंना मिळणार आहे. मुस्लिमांना मशीद बांधण्यासाठी पर्यायी जागा मिळणार असल्याचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी दिला आहे. रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आपला निकाल दिला आहे. आतील भाग अद्यापही वादग्रस्त असून ती जागा ट्रस्टच्या ताब्यात देण्यात येईल, यासाठी केंद्र सरकारने आगामी तीन महिन्यात ट्रस्ट स्थापन करावे, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

दरम्यान, 6 ऑगस्टपासून 16 ऑक्टोबरपर्यंत 40 दिवस हिंदू आणि मुस्लिम पक्षकाराची बाजू ऐकल्यानंतर कोर्टाने हा निर्णय राखून ठेवला होता. दरम्यान, सरन्यायाधीश गोगोई हे 17 नोव्हेंबरला निवृत्त होत असून त्याआधी त्यांनी या प्रकरणाचा निकाल दिला आहे. सुन्नी वक्फ बोर्डाने सुप्रीम कोर्टाच्या निकालाचे स्वागत केले आहे. 

मंगळवेढा तालुक्यातील सर्व मुस्लिम बांधवांनी या निर्णयाचे स्वागत केले असून सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल मान्य असल्याचे त्यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा