मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
आपल्या आवडत्या नेत्या बद्दल कोण काय करेल याचा काही नेम नाही असाच प्रकार मंगळवेढ्यात घडला असून राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निष्ठावान कार्यकर्त्याने चक्क छातीवर 'राष्ट्रवादी भारत नाना असे नाव गोंधवले असल्याने तालुक्यात चर्चा सुरू आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 7588214814
मंगळवेढा शहरातील साठेनगर येथे राहणाऱ्या आ.भारत भालके यांचा एक निष्ठावंत कार्यकर्ता पांडुरंग(मामु)अवघडे यांनी आपल्या छातीवर "राष्ट्रवादी भारत नाना" असे नाव गोंधवले असून नाव गोंधवल्या नंतर त्याने आमदार भारत भालके यांची भेट घेतली गोंधवलेले नाव दाखवले.
दरम्यान आमदार भारत भालके हे निवडून यावे यासाठी त्याने देवाला नवस केले असल्याचेही समजते.पांडुरंग अवघडे हे दिवसभर जोगती म्हणून शहरात फिरत लोकांकडून भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करीत आहेत.पांडुरंग अवघडेच्या हाताला आमदार भारत भालके यांनी काम मिळवून द्यावे अशी ही मागणी केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा