मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
सध्या महाराष्ट्रात सरकार स्थापन होणार का राष्ट्रपती राजवट लागू होणार याचीच चर्चा सुरू असताना भाजप व राष्ट्रवादी मिळून सरकार स्थापन करण्याचा हालचाली सुरू झाल्या असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
भाजपच्या कोअर कमिटीची बैठक गेल्या दीड तासापासून सुरू आहे यामध्ये भाजप नेते अमित शहा हे विडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आमदारांशी चर्चा करत आहेत तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांच्यात गेल्या काही तासापासून चर्चा सुरू आहे.
या दोन्ही बैठकीचा एकमेकांसोबत संबंध असल्याचे बोलले जात असून येत्या काही तासात अंतिम निर्णय समजणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा