"पाठित खंजीर खुपसणं काय असतं हे शरद पवारांना आज चांगलं कळलं असेल" - Mangalwedha Times

Breaking

रविवार, २४ नोव्हेंबर, २०१९

"पाठित खंजीर खुपसणं काय असतं हे शरद पवारांना आज चांगलं कळलं असेल"


मंगळवेढा टाईल्स वृत्तसेवा:-

स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या पाठित खंजीर खुपसून त्यांचे चांगले सरकार पाडणाऱ्या शरद पवारांना पाठित खंजीर खुपसणं काय असतं हे आज चांगलं कळलं असेल, अशी जहरी टीका माजी मंत्री डाॅ. शालिनीताई पाटील यांनी केली आहे. त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814

देशात विश्वासघातकी राजकारणाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेच जबाबदार आहेत. आजवर विश्वासघातकी राजकारण करणे शरद पवारांना नडले असून राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडाळीला ते स्वत: जबाबदार आहेत, अशी गंभीर टीका त्यांनी केली आहे.

चौकशांमधून सुटण्यासाठीच काकाच्या पाठीत पुतण्याने खंजीर खुपसला. आज खऱ्या अर्थाने स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या आत्म्याला चिरशांती लाभली आहे, असं शालिनीताई पाटील म्हणाल्या आहेत.

शरद पवारांनी 50 वर्षांपूर्वी एक पाप केले होते. जे पाप केले ते इथेच फेडावे लागतात. कोणी दगा दिल्यास काय त्रास होतो हे शरद पवारांना अनुभवायला येईल, असंही त्या म्हणाल्या आहेत. दरम्यान, शालिनीताई कट्टर पवारविरोधक म्हणून ओळखल्या जातात.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा