महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची जुळवाजुळव सुरू केली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपसोबत जाणे हा अजित पवारांचा वैयक्तिक निर्णय असल्याचे जाहीर केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली असून, पक्षाच्या आमदारांना एकत्रित करण्यास दोन्ही बाजूंनी सुरुवात झाली आहे.मंगळवेढा-पंढरपूरचे आ.भारत भालके हे कुणाकडे आहेत याचीच चर्चा सध्या मतदारसंघात सुरू आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
पक्षाध्यक्ष शरद पवार आमदारांना काय सूचना देतात याकडेही आता आमदारांचे लक्ष लागले आहे. भाजपसोबत सरकारमध्ये सामील झालेल्या अजित पवार यांनी वीस ते पंचवीस आमदार सोबत घेऊन भाजपला पाठिंबा दिला असल्याचे समजते, मात्र हे आमदार नेमके कोण याची स्पष्टता झाली नाही.
पुण्यातील दोन्ही आमदार सध्या पुण्यातच आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान आमदारांना आता अजित पवार हे वैयक्तिक रित्या फोनवरून संपर्क साधत असून त्यांनी आमदारांची जुळणी सुरू केली आहे. हे आमदार दुपारपर्यंत एका ठिकाणी जमणार असून, पुढे मुंबई ला रवाना होतील असेही एका आमदाराने सांगितले.
भाजप सोबत जाऊन सत्ता स्थापण्याचा अजित पवार यांचा निर्णय हा काही मोजक्या आमदारांना माहिती होता त्याची फारशी चर्चा कुठेही करण्यात आली नव्हती. मात्र सरकार स्थापनेसाठी आवश्यक असणाऱ्या आमदारांची जुळवाजुळव आणि त्यांची संमती अजितदादा यांनी यापूर्वीच घेतली होती. त्यानुसार हे सर्व आमदार आता एकत्र करण्याचे काम सुरू झाले आहे.
पक्षाच्या वतीने ही आपले आमदार अजितदादांसोबत जाऊ नयेत, यासाठी हालचाली सुरू झाल्या असून, आमदार फुटणार नाहीत यासाठी काय उपाययोजना करता येतील याची बैठक वरिष्ठ पातळीवर ती सुरू असल्याचे एका आमदाराने सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा