देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ;उपमुख्यमंत्री अजित पवार - Mangalwedha Times

Breaking

शनिवार, २३ नोव्हेंबर, २०१९

देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ;उपमुख्यमंत्री अजित पवार


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

एकीकडे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार स्थापन करण्याच्या घडामोडी सुरू असताना महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली आहे. तसेच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814


अखेर मंगळवेढा टाईम्स चा अंदाज खरा ठरला गेल्या 13 दिवसापूर्वी भाजप व राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची बातमी प्रसिद्ध केली होती ती खरी ठरली.






राजभवनात आज (शनिवार) राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी फडणवीस आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे अन्य नेते उपस्थित होते. महिना झाले सरकार बनत नव्हते, त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतल्याने अजित पवार यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील राजसत्तेचे शिवधनुष्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पेलणार असल्याचे स्पष्ट संकेत देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव यांच्या नावावर शिक्‍कामोर्तब केले होते. मात्र, महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाल्याचे पाहायला मिळाले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा