मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
अखिल भारतीय छावा संघटना मंगळवेढा यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आज सकाळी १० वाजता मंगळवेढ्यातील दामाजी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
या मध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस हजार इतकी मदत मिळावी भुसपांदीत शेतकऱ्यांना त्वरीत रक्कम मिळावी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशा मागण्या साठी हे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
याआंदोलनाला प्रमुख उपस्थिती म्हणून संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे पाटील हे उपस्थित राहणार आहेत तरी सर्व पदाधिकारी शेतकर्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन छावा संघटना वि.आ.तालुकाध्यक्ष अक्षय पवार व तालुकाध्यक्ष सुरज फुगारे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा