
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा शहरातील डॉ.श्रीकांत मर्दा यांनी तीन महिलांचे अवैधरीत्या गर्भपात केल्याप्रकरणात त्यांना औषध पुरवठा करणाऱ्या कर्नाटक राज्यातील होलसेल औषध विक्रेता सुरेश कल्लाप्पा कुंभार याला न्यायाधीश जी.एम . चरणकर यांनी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
मंगळवेढा शहरातील कुंभार गल्लीत डॉ.मर्दा यांचे मर्दा नर्सिंग होम असून येथे मागील महिन्यात : तीन महिलांचे अवैधरीत्या गर्भपात करताना पोलिसांनी छापा टाकला होता.यावेळी डॉक्टरसह दोन महिलांच्या पतींना अटक केली होती.आरोपी डॉ.मर्दा यांच्याकडे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अनिल गाडे यांनी गर्भपात करण्यासाठी औषध कोठून आणले , याबाबत वारंवार चौकशी केली.
मात्र आरोपी हा तपासात सहकार्य करीत नसल्यामुळे मंगळवेढ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकाऱ्यांनी तंत्रज्ञानाचा आधार घेऊन त्यांचे पथक कर्नाटक राज्यातील रामदुर्ग येथे पोहोचले.आरोपी सुरेश कुंभार यांचा होलसेल औषध विक्रीचा व्यवसाय आहे.
कुंभार हे डॉ.मर्दा यांना अवैध गर्भपात करण्याच्या प्रकरणात औषध पुरवठा करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.त्यानंतर अद्ययावत तंत्रज्ञानाची पोलसांनी मदत घेतली . यामुळे पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचण्यास यश मिळाले.आरोपी कुंभार हे डॉ.मर्दा यांना कुरिअरने औषध पुरवठा करीत असल्याचे तपासात उघड झाले.आरोपी कुंभार याला अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने २९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश सुनावले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा