मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
रत्नागिरी ते नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 च्या निर्मितीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत त्यांना मोबदला न देता जमिनी ताब्यात घेऊन काम करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने मंगळवेढा तालुका प्रहार शेतकरी व अपंग संघटनेने येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले असून सोमवारी या उपोषणाला अनेक नागरिकांनी भेटी देऊन पाठिंबा व्यक्त केला.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
मंगळवेढा मार्गे या महामार्गाचे काम सध्या अत्यंत वेगाने सुरू असून यात महामार्गासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी भू संपादित केल्या आहेत अशा शेतकऱ्यांना अद्यापि तांत्रिक बाबी समोर आणून जमिनीचा मोबदला देण्यात आला नसून नुकसान भरपाईपोटी मिळणारे लाखो रुपये शेतकऱ्यांच्या हातात न आल्याने शेतकरी सध्या अस्वस्थ आहेत यावर प्रहार शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना 25 नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला न मिळाल्यास मंगळवेढा येथील प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता त्यानुसार या उपोषणास सोमवारपासून सुरुवात झाली आहे
आमरण उपोषणात प्रा संतोष पवार सिद्राया माळी प्समाधान हेंबाडे आनंद गुंगे अरुण आवताडे रोहिदास कांबळे खंडू जाविर समाधान लेंडवे सह बाधीत विनायक दत्तू अजित दत्तू शिवाजी वाकडे आदि शेतकरी सहभागी झाले आहेत गेल्या वर्षभरापासून या भूसंपादन याबाबतच्या प्रक्रिया सुरू झाले असून यातील काही शेतकऱ्यांना भूसंपादन मोबदला देण्यात आला आहे तत्कालीन प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका स्वीकारली होती
कालांतराने त्यांची बदली झाल्यानंतर नव्याने रुजू झालेले प्रांताधिकारी या प्रकरणाला कायद्याच्या बाजू तपासून पाहण्यात व्यस्त आहेत अनेक शेतकऱ्यांच्या ूसंपादन केलेल्या जमिनी व त्यांना आलेल्या नोटिशीमध्ये तफावत असल्याने शेतकऱ्यांनी आपले संबंधित तक्रारी अर्ज प्रांताधिकार्यांना दिले यानंतर ज्याच्या शेतकऱ्यांच्या अडचणी असतील अशा शेतकऱ्यांच्या अडचणी कार्यालयीन विभागातून सोडविण्याबाबत शासनाने दिलेल्या नियमाप्रमाणे आवश्यक असताना याबाबत उचित कार्यवाही होत नसल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे. अशात ज्यावेळी वर्तमानपत्रातून भूसंपादन बाबत माहिती प्रसिद्ध करण्यात आली होती त्यावेळी हरकती घेण्याबाबत कालावधी देण्यात आला होता त्या कालावधीनंतर हरकती स्वीकारल्या जाणार नाहीत असा स्पष्ट उल्लेख असताना देखील काही हरकती या नव्याने गेल्या चार महिन्यात दाखल करण्यात आल्या असून या हरकती विचारात घेण्यात आल्याने अनेक शेतकरी त्यांच्या मोबदला पासून वंचित राहिले असून शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला न देता त्यांच्या मालकीच्या असलेल्या शेतात सध्या मोठ्या प्रमाणावर रस्ता निर्मितीचे काम सुरू आहे ाबाबत अनेक शेतकऱ्यांनी वेळोवेळी हे काम थांबवण्याबाबत प्रांताधिकार्यांना भेटून विनंती केली मात्र यावर कोणत्याही प्रकारचे कार्यवाही झाली नसल्याने रस्ते निर्मितीचे काम वेगात सुरू आहे. अनेक बाधित असणारे शेतकऱ्यांनी ार्यालयाकडे भूसंपादन याबाबतचा मोबदला मिळावा यासाठी अर्ज दाखल केले मात्र मोबदला देण्यात येत नाही असे कार्यालयाकडून अडचणी सांगितल्या जात असताना ते लेखी स्वरूपात देण्याबाबत विनंती केली असता कार्यालयाकडून त्या शेतकर्यांना कोणतीही लेखी पत्र देण्यात आले नाही. यामुळे बाधीत शेतकऱ्यांमधून संभ्रमाची अवस्था असून यावर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची त्यांनी गेल्या आठवड्यात भेट घेतली होती मात्र त्यांच्याकडून या प्रश्नाबाबत गांभीर्याने दखल घेतली नसल्याचे या उपोषणाच्या सुरुवात होण्यावरून दिसत आहे.
यावेळी नगरसेवक प्रवीण खवतोडे,युवराज शिंदे, प्रा.गणेश भुसे,प्रा.राजेंद्र नागणे,सिद्धराया माळी,शिवाजी वाकडे, राजाराम सूर्यवंशी,सुमंगल पटवर्धन,अनिल पाटील,दिंनकर भाकरे,सोमनाथ बुरजे,समाधान हेंबाडे,संभाजी गोसावी,धनाजी गवळी, विनायक दत्तू,अजित दत्तू,प्रवीण हजारे आदीजन शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा