मंगळवेढ्यात नवविवाहितेचा छळ;सासू,सासरा, पतीसह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Mangalwedha Times

Breaking

शनिवार, १६ नोव्हेंबर, २०१९

मंगळवेढ्यात नवविवाहितेचा छळ;सासू,सासरा, पतीसह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
लग्नात व्यवस्थित मानपान न केल्याने माहेरून अंगठी, तसेच कर्ज फेडण्यासाठी एक लाख रुपये घेवून ये असे म्हणून विवाहिता सारिका नेमचंद्र खांडेकर (वय २१ रा .दत्तू वस्तू डोंगरगाव) हिचा शारिरिक ,मानसिक छळ करून शिळे अन्न खाण्यास भाग पाडल्याप्रकरणी नवरा गणपत खांडेकर,सासू लक्ष्मी रामचंद खांडेकर,चुलत सासरा शिवाजी आप्पा खांडेकर , दिर रामचंद्र खांडेकर,चुलत दिर सज्जन खांडेकर,वैभव खांडेकर रा .खिलारवाडी ता . सांगोला, नणंद आरती सिध्देश्वर खोत रा . थबडेवाडी ता.कवठेमहांकाळ , विदया सचिन बजबळकर, रा .पिंपरी ता .माळशिरस , संजीवनी नरळे , रा . दंडाची वाडी , ता . सांगोला या नऊ जणांविरूध्द जाचहाटाचा गुन्हा दाखल झाला आहे. 
बातम्यां व जाहिरातीसाठी संपर्क :7588214814
या घटनेची हकिकत अशी , यातील फिर्यादी सारिका नेमचंद्र खांडेकर हिचा वरील नऊ आरोपीनी फेब्रुवारी २०१६ ते ११ सप्टेंबर २०१९ पर्यंत फिर्यादीच्या माहेरी दत्तू वस्ती डोंगरगाव येथे व सासरी मौजे खिलारवाडी ता . सांगोला या ठिकाणी तीच्या आई वडीलांनी लग्नात नवऱ्या मुलाचा मानपान व्यवस्थित केला नाही. 


तसेच मुलांना अंगठी घातली नाही असे म्हणून फिर्यादीस घालून पाडून बोलून उपाशी ठेवून शिवीगाळ व दमदाटी केली तसेच शिळे अन्न खाण्यास भाग पाडले . माहेरून कर्ज फेडण्यासाठी एक लाख रुपये आणले नाहीत म्हणून मानसिक त्रास देवून जाचहाट व छळ केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे . याचा अधिक तपास पोलिस नाईक जाधव हे करीत आहेत .




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा