मंगळवेढ्यात सराफ दुकानातील सोने लुटलेल्या चोरट्यांना पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडले - Mangalwedha Times

Breaking

शुक्रवार, १५ नोव्हेंबर, २०१९

मंगळवेढ्यात सराफ दुकानातील सोने लुटलेल्या चोरट्यांना पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडले


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

मंगळवेढा शहरातील अमोल ज्वेलर्समध्ये ग्राहक बनून आलेल्या चोरटयांनी ३५ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यावर दुकानदाराची नजर चुकवून डल्ला मारला होता.या प्रकरणी गणेश भिमसेन राठोडे (वय ३८) , त्याची पत्नी चांदुबाई गणेश राठोड (वय ३५ रा.आरकेरी जि . विजापूर) ,संजीव जमादार नाईक (वय ३४) व त्याची पत्नी शारदा उर्फ शारू संजीव नाईक (वय ३० रा.जलदर्गा जि.विजापूर) या चौघांना सी.सी.टी.व्ही फुटेजच्या आधारे जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे . 
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
दरम्यान या चौघांना मंगळवेढा न्यायालयाचे न्यायाधीश आर.व्ही नडगदल्ली यांच्यासमोर उभे केले असता तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. 


या घटनेची हकिकत अशी ,दि. ७ नोव्हेंबर रोजी सकाळी वरील चार आरोपी अमोल ज्वेलर्समध्ये सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने आले होते . त्यांनी कामगारांना सोने खरेदी करावयाचे असून चेन , मणीसेट , सोन्याचे डोरले आदी दाखविण्यास सांगितले . दागिने बघण्याचा बहाणा करून कामगारांची व दुकानमालकांची नजर चुकवून २२ हजार ६०० रुपये किमतीचे ५ . ६७० ग्रॅम सोन्याची चेन तसेच १२ हजार ५०० रुपये किमतीचे ३.१२० ग्रॅम वजनाचे सोन्याचे डोरले व मणी सेट यामध्ये चार मणी व दोन वाटया असा एकूण ३५ हजार १०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता . 

फिर्यादी अमोल रत्नपारखी यांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी दुकानातील सी.सी.टी.व्ही फुटेज तपासले असता वरील चौघे आरोपीनी घेवून गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पोलिसांत भा.दं.वि. ३७९,३४ प्रमाणे गुन्हा नोंदविला होता. उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील यांना वरील चौघे चोरीतील आरोपी हे पुन्हा गुरुवारी मंगळवेढयात आल्याचे गोपनीय माहिती प्राप्त होताच त्यांनी पोलिस निरिक्षक अनिल गाडे व तपासिक अंमलदार पोलिस नाईक बापूसाहेब पवार यांनी सकाळी १० वा. पाळत ठेवून कौशल्यपूर्वक वरील चौघांना ताब्यात घेवून जेरबंद केले. 



यावेळी त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली आहे. तपासिक अंमलदार पवार यांनी वरील चौघांना न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने दि . १६ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

दरम्यान ,पोलिसांनी सी.सी.टी.व्ही मध्ये कैद झालेले चोरटयांचे चेहरे पाहून चोरटयापर्यंत पोहोचण्यास मदत झाली आहे.शहरातील इतर सराफ ज्वेलर्सनी आपल्या दुकानात सी . सी . टी . व्ही . कॅमेरे बसवून चोरटयांपासून संरक्षण करावे असे आवाहन पोलिस निरिक्षक अनिल गाडे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा