मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
पुढील अडीच वर्षांसाठीच्या सभापतिपदाच्या आरक्षण सोडतीकडे मंगळवेढा पंचायत समिती सदस्यांचे लक्ष लागले आहे.सभापतिपदाचे आरक्षण सोडत आज मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात होत आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
मंगळवेढा पंचायत समितीचे उपसभापती बदलाची चर्चा आहे.अर्थात सभापती, उपसभापतिपदी कोणाची वर्णी लागणार , याबाबतचे सर्व अधिकार समाधान आवताडे व बबनराव आवताडे यांच्याकडे असतील,विधानसभा निवडणुकीमुळे कालावधी पूर्ण होऊनही पुढील अडीच वर्षांसाठीची आरक्षण सोडत काढता न आल्याने विद्यमान पदाधिकाऱ्यांना वाढीव मुदत मिळाली.मंगळवेढा पंचायत समितीचे सभापती ओबीसी पुरुष यासाठी आरक्षित होते.
त्यानुसार अडीच वर्षाचा कालावधीसाठी प्रदीप खांडेकर यांची निवड झाली होती. पुढील आरक्षण कोणते निघते व सभापतिपदी कोणाची वर्णी लागते याकडे पंचायत समिती सदस्य व राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.येणाऱ्या दोन वर्षांच्या काळात दोघांना संधी मिळते की कुण्या एकाची वर्णी लागते.याबाबत इच्छुक सदस्यांमध्ये चर्चा सुरू आहेत.
सभापतिपदचे आरक्षण आणि इच्छुकांच्या कामाची चाचपणी घेऊन सभापतिपदाची निवड होऊ शकते.पंचायत समितीवर आवताडे गटाचे वर्चस्व आहे. मागील अडीच वर्षाच्या कार्यकाळात सभापती प्रदीप खांडेकर व उपसभापती पाटील यांनी पंचायत समितीचा कार्यभार झाला आहे.उपसभापतीही बदलण्याची चर्चा आहे.
मंगळवेढा पंचायत समितीचे सभापती पदासाठी मागासवर्गीय किंवा खुला वर्ग यासाठी आरक्षित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा