मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतिपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी निश्चित झाले . पंचायत समितीत सध्या चार महिला सदस्य आहेत.त्यामुळे कोणाला संधी मिळणार हे देखील कसेही ठरणार असले तरी सभापतिपदावर मात्र आवताडे गटाचा वरचष्मा राहणार , हे मात्र नक्की असले तरी आरक्षणानंतर मंगळवेढ्यात खलबते सुरू झाली असून लॉटरी मासाळ की मस्के यांना?या घडामोडींना वेग आला आहे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
आठ सदस्य असलेल्या पंचायत समितीत ब्रह्मपुरी , चोखामेळानगर , हुलजंती , लक्ष्मी दहिवडी या पंचायत समिती गणात चार महिला सदस्य विजयी झाल्या . त्यामधील ब्रह्मपुरी गणातील कल्पना गडदे या आमदार भालके यांच्या समर्थक आहेत तर लक्ष्मी दहिवडी हलजंती,चोखामेळा नगरमधील तीन महिला सदस्या या जिल्हा बँकेचे संचालक बबनराव आवताडे व दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांच्या समर्थक आहेत . तीन महिला आवताडे गटाकडे असल्यामुळे पंचायत समिती सभापतिपद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बबनराव आवताडे व समाधान आवताडे हे ठरवणार आहेत .
अडीच वर्षांपूर्वी झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आवताडे गटाचे आठ पैकी पाच सदस्य विजयी झाले.विधानसभा निवडणुकीत काही सदस्यांच्या गणांमध्ये कमी मताधिक्य मिळाले . त्यामुळे भविष्यातील राजकारणाचा विचार करता ते कुणाला संधी देतात हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे . त्यामध्ये मरवडे , हलजंती , चोखामेळानगर , लक्ष्मी दहिवडी , भोसे गणात आवताडे गटाचे तर ब्रह्मपुरी , बोराळे , रड्डे पंचायत समिती गणामध्ये आमदार भालके गटाचे उमेदवार विजयी झाले . परंतु सध्याच्या राजकीय परिस्थितीत विधानसभा निवडणुकीत सुरेश ढोणे यांनी आवताडे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे तर पक्षनेते नितीन पाटील यांनी आमदार भारत भालके गटाला सोडचिठ्ठी दिली .
आवताडे गटाने सभापतिपद खुले असतानाही धनगर समाजाचे प्रदीप खांडेकर यांना अडीच वर्षे संधी दिली. लिंगायत समाजाच्या विमल पाटील ओबीसी प्रवर्गातून निवडून आल्या आहेत.त्यांना उपसभापतिपदी संधी दिली.
आता सभापतिपदासाठी अनुसूचित जातीच्या गणातील उज्वला मस्के यांचे नाव चर्चेत होते .
परंतु सध्याच्या राजकीय परिस्थितीत विधानसभा निवडणुकीत सुरेश ढोणे यांनी आवताडे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे तर पक्षनेते नितीन पाटील यांनी आमदार भारत भालके गटाला सोडचिठ्ठी दिली . त्यामुळे सध्या पक्षीय बलाबलाचा विचार करता सभापतिपदी आवताडे गटाला संधी मिळणार हे आजमितीस निश्चित मानले जात असले तरी उपसभापतिपदी कुणाला संधी मिळणार हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा