मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
केंद्र सरकारच्या कृषी योजनेत खात्यावर आलेले निम्मे पैसे मला दे असे म्हणून चिडलेल्या भावाने सख्या भावाला चाकूने भोकसल्याचा प्रकार हाजापूर ता . मंगळवेढा) येथे घडला असून या प्रकरणी केराप्पा कृष्णा भिसे ( वय ३५ ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
या घटनेची हकिकत अशी की , यातील फिर्यादी नाथाजी कृष्णा भिसे ( वय ४० रा . हाजापूर ) यांच्या खात्यावर केंद्र सरकारच्या कृषी योजनेचे चार हजार रुपये जमा झाले होते. तर आरोपी केराप्पा याच्या नावे दोन हजार रुपये जमा झाले.
तु मला ते दोन हजार दे असे म्हणून भोकसून तुला खलास करेन असे म्हणत आरोपीने कमरेच्यावर पोटात भोकसून नाथाजी यास जखमी केले.दि . १० डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वा . रहाते घरासमोर घडली .जखमीवर सोलापूर येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा