मंगळवेढा येथे कार्यरत असलेल्या एका पोलिस नाईकाने दारूच्या नशेत चारित्र्यावर संशय घेवून पत्नीस मारहाण केल्याने पत्नीच्या नाकाचे हाड फॅक्चर झाले असून त्याचेवर कारवाई करण्याची मागणी त्याच्या पत्नीने जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली आहे.
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
याबाबत अधिक माहिती अशी की , मंगळवेढा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस नाईक तानाजी इंगोले यांचे २८ मे २०११ रोजी दिपाली यांचेबरोबर लग्न झाले असून त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे.
गेल्या पाच वर्षापासून सदर पोलिस नाईक तानाजी इंगोले हे दारूने व्यसनाधीन झाले असून ते आपला शारीरीक व मानसिक छळ करून चारित्र्यावर संशय घेवून मारहाण करीत असल्याची दिपाली यांची तक्रार आहे.
तसेच याकामी त्याला सासू ,सासरा ,दीर व जाऊ हे मदत करीत असतात.६ डिसेंबर रोजी त्यानी मारहाण केल्याने दिपाली यांच्या नाकाचे हाड फॅक्चर झाले असून उपचारासाठी त्यांना खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सदर पोलिस नाईक तानाजी इंगोले यांचेपासून आपणास व आपल्या कुटुबास धोका असून त्यांचेवर कारवाई करावे तसेच त्याचेवर इतर विविध गुन्हेही दाखल असून आपल्या निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून न्याय मिळावा अशी मागणी दिपाली इंगोले यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा