मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा तालुक्यातील मारोळी येथील महादेव लक्ष्मण पाटील यांचे भर दिवसा कडी कोयंडा तोडून, कुलूप काढून घरफोडी करत तब्बल ८ लाख ५० हजार रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारून सोण्या-चांदीचे दागीने व २० हजार रोकड असा ऐवज लंपास केल्याची घटना शुक्रवार दिनांक १३ डिसेंबर रोजी दुपारी 12 ते 1 वाजणेच्या दरम्यान घडली आहे.
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
याबाबत सविस्तर माहिती अशी की, महादेव पाटील हे गावात दुपारी १२ च्या सुमारास घराला कुलूप लावून अंत्यविधी साठी गेले होते.अंत्यविधी आटपून आल्यानंतर घरात चोरी झाल्याचे लक्षात आले त्यांनी मंगळवेढा पोलिसांना संपर्क करून याची माहिती दिली घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
परंतु या अशा वारंवार घडणार्या घटनांनी मंगळवेढा व परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा