मंगळवेढा तालुक्यातील ६ मंडळ मधील ८१ गावातील ७७ हजार ८२७ सातबारा धारक शेतकऱ्यांना स्वाक्षरी डिजिटल सातबारा उतारे तयार झाले आहेत आता ऑनलाइन स्वरूपातील व डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांना सातबारा उताऱ्यासाठी तलाठ्याच्या मागे भाऊसाहेब उताऱ्यावर सही करा म्हणून मागे पळण्याची गरज राहणार नाही.
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
सातबारा संगणीकरन मोहिमेत तहसीलदार स्वप्निल रावडे यांच्या मंगळवेढा महसूल टीमने ९८.३४ टक्के काम करून पुणे विभागातील पाच जिल्ह्यातील ५८ तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळाला आहे.
शासनाच्या भूमिअभिलेख विभागाने शेतकऱ्यांचे सातबारा, फेरफार आठ अ हे उतारे ऑनलाइन केले आहेत मात्र त्यावर डिजिटल स्वाक्षरी नसल्यामुळे नागरिकांना उतारे काढण्यात अडचणी येत होत्या परिणामी अनेक वेळा नागरिकांना पारंपरिक पद्धतीचा वापर करून थेट तलाठ्यांकडून सातबारा उतारे काढावे लागत होते उताऱ्यावर सहीसाठी भाऊसाहेब कडे चकरा माराव्या लागत होत्या.आता सातबारा उतारा, फेरफार आणि आठ अ उताऱ्यावर डिजिटल स्वाक्षरी करण्याचे काम पूर्णत्वास आले आहे.
डिजिटल सातबारा उताऱ्यामध्ये मंगळवेढा तालुका नंबर वन राहिला तालुक्यात ७९ हजार १४३ सर्व्हे क्रमांक मध्ये ७७ हजार ८२७ सातबारा उताऱ्यावर डिजिटल स्वाक्षरी चे पूर्ण झाले आहे केवळ १ हजार ३१६ उताऱ्यावर स्वाक्षरीचे काम बाकी आहे ते ही लवकरच पूर्णत्वास येईल असे तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा