मंगळवेढा येथील २० वर्षीय तरुणाचा पंढरीत संशयास्पद मृत्यू - Mangalwedha Times

Breaking

शुक्रवार, २० डिसेंबर, २०१९

मंगळवेढा येथील २० वर्षीय तरुणाचा पंढरीत संशयास्पद मृत्यू



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

मंगळवेढा तालुक्यातील मुंढेवाडी येथील रहिवासी असलेल्या योगेश एकनाथ घोडके (वय २०) या युवकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.ही घटना हत्या असल्याचा प्राथमिक अंदाज चौकशीतून पुढे येत आहे. येथील जना कराड नाका येथे सदर युवक राहत असलेल्या खोलीमध्ये योगेश घोडके याचा मृतदेह आढळून आला. 

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814


योगेश घोडके हा युवक पंढरपूर येथील डॉ. मासाळ यांच्या सेवा हॉस्पिटल मध्ये गेल्या अनेक दिवसापासून नोकरी करत होता. हॉस्पिटल शेजारी असलेल्या दुसऱ्या इमारतीमध्ये राहत होता. गुरुवारी सकाळी आपले काम संपवन हॉस्पिटल मधून तो बाहेर पडला होता. 

दुपारी चारच्या सुमारास योगेश हा आपल्या खोलीमध्ये मयत झाला असल्याची खात्री पटल्यानंतर डॉ.मासाळ यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यास संपर्क केला.पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पोलीस तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली. योगेश घोडके हा युवक त्याच्याखोली मध्ये संशयास्पदरीत्या मयत झाल्याची पोलिसांनी खात्री केली. त्याच्या गळ्यावर वण आढळून आल्याने योगेश याने आत्महत्या केली नसल्याचा अंदाज पोलिसांना आला योगेश याचा खुन झाला असल्याचा संशय पोलिसांना आला. 

दरम्यान पंढरपूर शहर पोलिसांनी काही संशयित तरुण तरुणींना ताब्यात घेऊन चौकशी करण्यास सुरुवात केली असून योगेश याने आत्महत्या केली की त्याचा खून झाला ? ही माहिती थोड्या कालावधीत मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा