मंगळवेढयाच्या निःशब्द लघुपटाची आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवासाठी निवड - Mangalwedha Times

Breaking

गुरुवार, १९ डिसेंबर, २०१९

मंगळवेढयाच्या निःशब्द लघुपटाची आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवासाठी निवड


मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

पुणे येथे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवासाठी मंगळवेढा येथील शहर एंटरटेनमेंट ची तिसरी निर्मिती असलेल्या  निःशब्द या लघुचित्रपटाची निवड करण्यात आली आहे.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814


15 डिसेंबर ते 30 डिसेंबरपर्यंत म्हणजे तब्बल 15 दिवस हा महोत्सव पुणे येथील नांदेड सिटी येथे चालणार असून खिसमसच्या दिवशी म्हणजेच  25 डिसेंबर रोजी हा लघुचित्रपट या महोत्सवात दाखविण्यात येणार आहे. या महोत्सवात जगभरातील 132 देशातील लघुचित्रपटांनी सहभाग नोंदविला असून त्यात मंगळवेढयाच्या मातीतल्या लघुपटाचाही समावेश आहे.

या  लघुचित्रपटाची निर्मिती दिगंबर भगरे यांनी केली असून दिग्दर्शन संतोष शिंदे यांचे आहे.या लघुपटात पुणे येथील अभिनेत्री जयश्री गोविंद यांचेसह मंगळवेढयाचे अजिंक्य कुलकर्णी,भारत दत्तू, आकाश रोंगे,संतोष ढावरे,हरीप्रसाद देवकर,राहुल पांढरे,अमोल वस्त्रे अशा अनेक कलाकारांनी काम केले आहे.तर लघुचित्रपटाचे छायाचित्रण अदित्य कमोदकर यांनी केले आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा