मंगळवेढ्यात घरफोडीचे सत्र सुरूच तिसऱ्या दिवशी बंद घराचे कुलुप तोडून ६० हजाराचा ऐवज लंपास - Mangalwedha Times

Breaking

गुरुवार, १९ डिसेंबर, २०१९

मंगळवेढ्यात घरफोडीचे सत्र सुरूच तिसऱ्या दिवशी बंद घराचे कुलुप तोडून ६० हजाराचा ऐवज लंपास



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

मंगळवेढा तालुक्यातील मुंढेवाडी येथील बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरटयांनी तब्बल ५९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814


याबाबत अधिक माहिती अशी की , मुंढेवाडी येथील यशवंत बाबूराव पाटील (वय ७३) यांच्या बंद घरात १० डिसेंबर रोजी सकाळी १०.०० ते १८ डिसेंबर रोजी सकाळी ७.०० चे दरम्यान अज्ञात चोरटयाने कुलूप तोडून घरात प्रवेश केला व घरातील लोखंडी कपाट उचकटून रोख रक्कम ३५ हजार रुपये , सोन्याचे दागिने , १५ साडया असा एकूण ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला अशी फिर्याद यशवंत पाटील यांनी पोलिसांत दिली असून अधिक तपास हवालदार गायकवाड करीत आहेत.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा