मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथे भर दिवसा बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून स्वयंपाक घरातील भांडी,सोन्याचे दागिने,रोख रक्कम असा २२ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरटयांनी चोरून नेला असून अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
दरम्यान मागील दोन दिवसापुर्वी मारोळी येथे भरदिवसा चोरटयांनी घराचे कुलूप तोडून ५ लाख ७८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला असून पोलिसांना अदयापही चोरटे सापडले नसताना पुन्हा चोरटयांनी भरदिवसा घरफोडी करून पोलिसांना आव्हान केले आहे.
यातील हकिकत अशी की,फिर्यादी कमल तिपय्या स्वामी (रा.हुलजंती ) यांचे दि.१७/१२ च्या सकाळी ८ च्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयाने फिर्यादीचे बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून स्वयंपाक घरातील ५०० रुपये किमतीची भांडी तसेच पत्र्याचे पेटीत डब्यात ठेवलेले १२ हजार ३०० रोख रक्कम व ७ ग्रॅम सोन्याची बोरमाळ , ५००० रुपये किमतीची येथे असा एकूण २२ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरटयांनी चोरून नेला आहे .
अधिक तपास पोलिस नाईक धानगोंडे करीत चोरटयांचे आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा