मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना मंगळवेढा पंचायत समितीचा(शिक्षण) विस्तार अधिकारी लक्ष्मीकांत कुमठेकर (वय 45) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. मंगळवेढा येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयात सायंकाळी पाचच्या सुमारास पथकाने सापळा रचून ही कारवाई केली.
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
याबाबत सविस्तर माहिती अशी की,लाचखोर लक्ष्मीकांत कुमठेकर यांनी तक्रारदार यांच्या शैक्षणिक संस्थेचा खुलासाचा अहवाल सादर करण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
ही कारवाई लाचलुचपतचे पोलिस निरीक्षक कविता मुसळे यांच्या पथकाने केली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा