मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा पोलिस स्टेशनमध्ये मुद्देमाल विभागात कार्यरत असलेले पोलिस हवालदार जराचंद काळेल यांना वारंवार अधिकाऱ्यांनी सूचना देवूनही गुन्हे पेंडींग ठेवल्याप्रकरणी पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी सोमवारी तडकाफडकी निलंबीत केल्याची माहिती पोलिस निरिक्षक अनिल गाडे यांनी दिली . दरम्यान या निलंबन कारवाईमुळे इतर कामचुकार कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे .
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
पोलिस हवालदार जराचंद काळेल हे मागील दोन वर्षापूर्वी मंगळवेढा पोलिस स्टेशनमध्ये रूजू झाले होते.यापुर्वी त्यांनी मंगळवेढा शहर व अन्य बीटमधून काम करताना ते वादग्रस्त ठरले होते. नुकतेच कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक डॉ .सुहास वारके यांनी तपासणी केली.
सोमवारी पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी पोलिस स्टेशनची वार्षिक तपासणी केली असता पोलिस हवालदार काळेल यांच्याकडील पेंडींग गुन्हयाचे प्रमाणे मोठया प्रमाणात आढळून आले , यापुर्वी पेडींग गुन्हे निर्गती करण्यासाठी डी . वाय . एस . पी . दत्तात्रय पाटील व पोलिस निरिक्षक अनिल गाडे यांनी वांरवार सूचना देवूनही त्याची अंमलबजावणी केली नाही .
पोलिस अधिक्षक यांच्या पाहणीत काळेल यांच्या पेंडींग गुन्हे असलेबाबत निदर्शनास आल्याने जागेवरच त्यांना निलंबीत केल्याचा आदेश बजावण्यात आला असून काळेल यांना पोलिस पोलिस मुख्यालय येथे तात्काळ हजर राहण्याचा आदेश बजावला आहे .
दरम्यान बीटमधील इतर कर्मचारीही आपले मुख्य काम बाजूला सारून चिरीमिरीच्या मागे धावणाऱ्या कर्मचाऱ्यांत या निलंबन कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा