मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा तालुक्यातील लोणार येथील इयत्ता ९ वीच्या वर्गात शिकणाऱ्या एका १५ वर्षीय मुलीस अज्ञात इसमाने फुस लावून पळविल्याची तक्रार तीच्या पित्याने मंगळवेढा पोलिसात नोंदविली आहे.
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
याबाबत अधिक माहिती अशी की,सदर अल्पवयीन शाळकरी मुलगी ही फिर्यादीची सासरवाडी पडोळकरवाडी येथे शिक्षणासाठी रहात असून फिर्यादीचे सासू व सासरे यांना त्या मुलीने फोन करून माझी मंगळवेढा येथे परिक्षा आहे असे सांगून ती एसटीने निघून गेली.
ती अदयापपर्यंत परत आली नाही.म्हणून तीच्या पळविल्याची पित्याने तीला कोणीतरी अज्ञात कारणावरून अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेले अशी फिर्याद दिली.
पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात इसमाविरूध्द भा . दं .वि .स कलम ३६३ प्रमाणे शिक्षणासाठी गुन्हा दाखल केला असून अधिक व तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक भगवान बुरसे हे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा