मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने तालुक्याच्या ग्रामीण भागातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या डाळिंबाची विक्री तालुक्यातच व्हावी यासाठी डाळिंब सौदे केंद्राचे उद्घाटन आज सोमवारी दिनांक 23 डिसेंबर रोजी माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे यांनी दिली.
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बबनराव आवताडे अध्यक्षस्थानी असणार आहेत. यावेळी दामाजी कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे,पंचायत समिती सभापती प्रदीप खांडेकर, समाज कल्याण सभापती शीला शिवशरण, उपसभापती विमल पाटील, दिलीप चव्हाण,मंजुळा कोळेकर, प्रेरणा मासाळ, उज्वला मस्के,सुरेश ढोणे,नगरसेवक रामचंद्र कोंडूभैरी, अनिल बोदाडे, लक्ष्मी म्हेत्रे, विमल माने, दत्तात्रय जमदाडे, येताळा भगत सर, आदी उपस्थित असणार आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समितीच्या माध्यमातून अनेक विधायक उपक्रम राबवले. शेतकऱ्यांसाठी हमीभावाने तूर, मका, हरभरा पिकाचे हमीभाव केंद्र सुरू करून तालुक्यातील शेतकऱ्यांना जवळच बाजारपेठ उपलब्ध करून दिली. शिवाय कांदे, वांगी आदींचे सौदे उपलब्ध करून देताना चांगला उच्चांकी दर देण्याचाही प्रयत्न केला आहे. या डाळिंब सौद्याच्या प्रारंभास शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सचिव सचिन देशमुख यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा