कर्नाटक राज्यातून फलटण ( जि . सातारा ) कडे जाणारा १ लाख २८ हजार रुपये किमतीचा अवैधरित्या ओमनी गाडीतून जात असताना मंगळवेढा पोलिसांनी हुलजंती परिसरात पकडला.
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
पोलिसांनी ओमनी गाडीसह गुटखा जप्त करून वाहनचालक व त्याचा साथीदार या दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
या घटनेची हकिकत अशी की,दि.२२ रोजी सायंकाळी ७.०० वा. कर्नाटक राज्यातील चडचण येथून एम एच ४२ ए १९६१ या ओमनी गाडीतून अवैधरित्या गुटखा येत असल्याची खबर डी . वाय . एस . पी . दत्तात्रय पाटील यांना मिळाली . पोलिस निरिक्षक अनिल गाडे यांनी पोलिसांचे एक पथक तयार करून हुलजंती शिवारात चडचण मार्गावर सापळा लावला असता सायंकाळी ७ . १० च्या दरम्यान अंधार पडल्यानंतर मंगळवेढयाच्या दिशेने एक ओमनी येत असल्याचे या पथकाच्या निदर्शनास आले .
ओमनीला थांबवून वाहनचालकांकडे चौकशी केली असता वाहनाच्या पाठीमागील बाजूस पांढऱ्या रंगाच्या पोत्यामध्ये विमल पान मसाला , आर . एम . डी . गुटखा असल्याचे पोलिसांना आढळून आले . सदर वाहन गुटख्यासह १ लाख ९८ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेवून मंगळवेढा पोलिस ताब्यात स्टेशनमध्ये आणन लावला राज्यातून आहे.
आरोपी चालक गणेश सुरेश बोधे ( वय ४२ हजार रा . कदम वस्ती फलटण ) व त्याचा साथीदार शितल वीरकुमार दोषी ( वय ३८ रा . दहिगाव ता . माळशिस या दोघांना पोलिसांनी कारवाईसाठी ताब्यात घेतले असून त्याची फिर्याद सोलापूर येथील अन्न व औषध प्रशासनचे अधिकारी मंगेश लवटे यानी दिली आहे .
सदरची कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी डॉ मंगेश लवटे , प्रशांत कुचेकर यांनी अन्न विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रदीप राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केली दरम्यान , महाराष्ट्र सरकारने तरूणांचे हित जोपासण्यासाठी गुटख्यावर बंदी घातली आहे . शेजारच्या कर्नाटक राज्यामध्ये बंदी नसल्यामुळे कर्नाटकात जावून व्यवसायिक गुटखा खरेदी करून खुलेआम विक्री करत असल्याचे चित्र आहे .
यावर कारवाई करण्यासाठी अन्न औषध प्रशासन यांना अधिकार आहेत . या अधिकाऱ्यांचेही सोयीस्करपणे दुर्लक्ष होत असल्यामुळे मंगळवेढा व ग्रामीण भागात हॉटेल , पानटपऱ्या येथे अव्वाच्या सव्वा किमतीला गुटखा पुडयाची विक्री करून स्वतःच्या तुंबडया भरल्या जात आहेत . हुलजंती हा भाग कर्नाटक सीमेला लगत असल्यामुळे या भागातील चोरटया किमतीचा मार्गानेही गुटखा अन्य जिल्हयामधे जात असल्याची चर्चा गुटखा पकडल्यानंतर सुरु होती .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा