आभासी चलनातून दामदुप्पट रक्कम देतो असे आमिष दाखवून एका डॉक्टर भामट्याने मंगळवेढा, औरंगाबाद ,पुणे ,पंढरपूरसह अनेक शहरांतील व्यावसायिक , शेतकरी आणि प्रतिष्ठित लोकांना लाखो रुपयांचा आर्थिक गंडा घालून त्यांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
आर्थिक फसवणूक प्रकरण समोर आले आहे . या फसवणूक प्रकरणी पंढरपुरातील डॉ . राहुल ज्ञानेश्वर शेजाळ (रा.ढवळस रोड, मंगळवेढा) याच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीट कॉईन या आभासी चलनातून दामदुप्पट रक्कम करून देतो ,असे आमिष दाखवून संशयित आरोपी डॉ . शेजाळ या भामट्याने औरंगाबाद , पुणेसह पंढरपूर शहर व तालुक्यातील सुमारे २८ लोकांची सुमारे २२ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक करून त्यांना गंडा घातला आहे.
या प्रकरणी मधुकर देशपांडे (रा.पंढरपूर ) यांनी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात आज संशयित आरोपी डॉ . शेजाळ याच्या विरोधात फिर्याद दिली आहे . जून २०१८ पासून ते आजपर्यंत डॉ . शेजाळ याने पंढरपूर , सांगोला , माळशिरस आदी भागांतील अनेक लोकांशी सलगी करून बीट कॉईनच्या माध्यमातून दुप्पट रक्कम करून देतो असे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले आहेत . गुंतवणूक केलेल्या लोकांनी मुदतीनंतर वारंवार पैशाची मागणी करून त्याने पैसे देण्यास टाळाटाळ केली . अखेर श्री . देशपांडे यांनी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबधित एजंट असलेल्या डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल केला
यात मंगळवेढा,पंढरपूर , गुरसाळे , उपरी येथील फसवणूक झालेल्या लोकांचा समावेश आहे. संशयित आरोपीने लोकांना गंडा घालून सुमारे ३५ ते ४० लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे . शिवाय अनेक जागा खरेदी केल्याचेही पोलिस तपासात पुढे आले आहे.पोलिस उपनिरीक्षक दशरथ वाघमोडे तपास करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा