मंगळवेढा : समाधान फुगारे
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून हॅट्रीक साधलेले आमदार भारत तुकाराम भालके यांचा राज्यमंत्रीमंडळात समावेश निश्चित झाला असून त्यांना विधानसभेचे उपसभापतीपद मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
आमदार भारत भालके यांनी सन 2009 रोजी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, 2014 साली विद्यमान विधानपरिषद सदस्य प्रशांत परिचारक तर 2019 रोजी राज्य परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष सुधाकरपंत परिचारक या तीन दिग्गजांचा पराभव करून विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे पराभूत झालेले तिघे राष्ट्रवादीमधील दिग्गज नेते होते. तर आमदार भालके यांनी अपक्ष व इतर पक्षांमधून निवडणूक लढवून हॅट्रीक साधली आहे. आज पराभूत झालेेले तिघेही राष्ट्रवादीला सोडून गेले आहेत आणि भारत भालके हे आज राष्ट्रवादीसोबत आहेत त्यामुळे निश्चितच त्यांच्या निष्ठेला न्याय मिळणार आहे.
मंगळवेढा तालुक्याच्या जिव्हाळयाचा असणारा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी आमदार भारत भालके हे मंत्रीमंडळात असणे गरजेचे आहे. ते मंत्री झाल्यास अथवा विधानसभेचे उपाध्यक्ष झाल्यास लवकरच हा पाणीप्रश्न मार्गी लागेल अशी अपेक्षा दक्षिण भागातील जनतेला आहे. या अपेक्षांचा विचार राष्ट्रीय नेते शरद पवार हे नक्कीच करून आमदार भालकेंना न्याय देतील असे चित्र आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा