मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
C.A.A व N.R.C या कायद्यांच्या विरोधात व सरकारच्या अत्याचाराच्या निषेधार्थ मंगळवेढा प्रांतकार्यालयावर आज दुपारी दोन वाजता मोर्चा.
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
संपूर्ण देशभरामध्ये C.A.A व N.R.C या कायद्यांच्या विरोधात मोर्चे आंदोलन होत असताना सरकारने विरोध करणाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी विरोध मोडून काढण्यासाठी अत्यंत क्रूर पद्धतीने मोर्चे काढणारावर जुलूम जबरदस्ती केली.
सरकार हुकूमशाही पद्धतीने वागत असून केंद्रातील सरकारला धर्मा धर्मा मध्ये तेढ निर्माण करण्याचा कुटील डाव या कायद्यामध्ये दिसत आहे. मंगळवेढा तालुका समतेच्या विचाराचा पुरस्कार करणारा आहे.
सरकार जर धर्मा धर्मा मध्ये तेढ निर्माण करण्यासाठी कायदे करत असेल तर मंगळवेढ्यातील जनता शांत बसणार नाही.सरकारच्या अत्याचाराच्या निषेधात करण्यासाठी मंगळवेढा मुस्लिम जमियत, मंगळवेढ्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना संभाजी ब्रिगेड सर्व पुरोगामी विचाराच्या संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दामाजी चौक ते प्रांत कार्यालय मोर्चा काढण्यात येणार आहे.
दामाजी चौक मंगळवेढा येथे हजर राहावे असे आव्हान मुस्लिम जमियत तर्फे मुजम्मील काझी व जमीर इनामदार यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा