अखिल भारतीय वारकरी मंडळाच्यावतीने ह.भ.प.प्रकाश बोधले व ह.भ.प. सुधाकर इंगळे यांचा भव्य सत्काराचे आयोजन - Mangalwedha Times

Breaking

गुरुवार, २६ डिसेंबर, २०१९

अखिल भारतीय वारकरी मंडळाच्यावतीने ह.भ.प.प्रकाश बोधले व ह.भ.प. सुधाकर इंगळे यांचा भव्य सत्काराचे आयोजन



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

मंगळवेढा येथील श्री संत दामाजी मंदिरात अखिल भारतीय वारकरी मंडळाच्यावतीने अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.प्रकाश बोधले महाराज व अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या  प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेबद्दल ह.भ.प.सुधाकर इंगळे महाराज यांचा  दि.30 रोजी सकाळी 10.00 वा. भव्य सत्कार सोहळा आयोजित केल्याची माहिती संयोजक ह.भ.प.ज्ञानेश्वर भगरे,व ह.भ.प.निलेश गुजरे यांनी दिली.



कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दामाजी संस्थेचे अध्यक्ष विष्णूपंत आवताडे हे राहणार आहेत.अखिल भारतीय वारकरी मंडळाचे  राष्ट्रीय अध्यक्ष, ह.भ.प.प्रकाश बोधले महाराज हे प्रथमच मंगळवेढयात येत आहेत. 

तसेच अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या प्रदेशाध्यक्षपदी ह.भ.प.सुधाकर इंगळे महाराज यांची निवड झालेबद्दल अखिल भारतीय वारकरी मंडळ शहर व तालुक्याच्यावतीने भव्य सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.याचबरोबर सोलापूर जिल्हाध्यक्षपदी ह.भ.प.जोतीराम चांगभले महाराज,सोलापूर शहर सचिवपदी ह.भ.प.बळीराम जांभळे महाराज,कायदेशीर सल्लागारपदी ह.भ.प.नागनाथ पाटील महाराज,सोलापूर शहराध्यक्षपदी ह.भ.प.संजय पवार महाराज,मंगळवेढा महिला शहराध्यक्षपदी ह.भ.प.सौ.संगिता सर्जेराव आवताडे यांची निवड झालेबद्दल सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. 

मंगळवेढा शहर व तालुक्यातील सर्व वारकरी बांधवांनी या कार्यक्रमास मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अखिल भारतीय वारकरी मंडळ,मंगळवेढा शहर व तालुक्याच्यावतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा